पाच महिन्यांपासून 'एनजीटी' चे काम बंद; पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष
Tuesday, Jun 5 2018 1:11PM    CHECKMATE TIMES
Tags: ngt, national green tribunal, ngt zonal benches, ngt bench pune, ngt headquarter, importance of ngt, 1000006772

न्यायाधिशांच्या नियुक्‍त्या रखडलेल्या

 

पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): ५ जून हा दिवस जगात सर्वत्र 'जागतिक पर्यावरण दिवस' म्हणून साजरा केला जातो. या वर्षी पर्यावरण दिनाच्या यजमान पदाचा मान भारताला मिळाला आहे. हे सर्व होत असताना देशात मात्र पर्यावरणविषयक समस्यांबाबत अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. पर्यावरणीय समस्यांचा निवाडा करणाऱ्या राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) पश्‍चिम विभागाचे कामकाज गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. न्यायाधिशांच्या नियुक्त्या रखडल्याने विविध स्वरूपाच्या तब्बल दोन हजार याचिका न्यायाधिकरणाकडे प्रलंबित आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, देशातील पर्यावरणसंबंधी विविध प्रकारच्या प्रश्नांचे तसेच खटल्यांचे निराकरण करण्यासाठी हरित न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. याचे मुख्यालय हे दिल्ली येथे असून, पुणे (पश्‍चिम विभाग), भोपाळ (मध्यवर्ती विभाग), चेन्नई (दक्षिण विभाग) आणि कोलकता (पूर्व विभाग) या ठिकाणी विभागीय न्यायाधिकरणे सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक विभागांतर्गत काही राज्यांमधील पर्यावरणविषयक याचिकांवर सुनावणी करण्यात येते. मात्र, पुणे येथील विभागीय न्यायाधिकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे.

 

विकासाच्या नावाखाली अनेकदा पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या प्रकल्पांना सरकारकडून मान्यता दिली जाते. मात्र, असे प्रकल्प कायद्याच्या कचाट्यात सापडत असल्याने न्यायाधिकरण त्यांच्या विरोधात निकाल देते. त्यामुळेच हरित न्यायाधिकरण बंद पाडण्याचा कट सरकारकडून केला जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला असून, न्यायाधिशांच्या नियुक्‍त्या रखडवून न्यायाधिकरणाचे काम होऊ न देणे हा त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: ProblemZone,   Business Category: NA   Similar News ID: 1000000148