पुणे मेट्रो प्रकल्प विकास आराखड्याशी विसंगत
Tuesday, Jun 5 2018 1:13PM    CHECKMATE TIMES
Tags: pune metro project, pune metro, aba bagul doubts pune metro project, pune development plan, pune dp, saurabh rao, pune collector, pune public transport, 1000006773

माजी उपमहापौर आबा बागूल यांकडून शंका व्यक्त

 

पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि एकूणच शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या मेट्रो प्रकल्पावर विरोधी पक्षांनी शंका घेण्यास सुरुवात केली आहे. विकास आराखड्यानुसार मेट्रोची आखणी करण्यात आली नसून, ते भविष्यात अडचणीचे ठरणार असल्याची भीती माजी उपमहापौर आबा बागूल यांनी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत मेट्रो प्रशासनाने तात्काळ खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहरात सध्या मेट्रो प्रकल्पाचे काम अतिशय वेगात सुरु आहे. मात्र, मेट्रो प्रकल्पाची आखणी विकास आराखड्यानुसार करण्यात आली नसल्याने भविष्यात मोठे अडथळे निर्माण होणार असल्याचा दावा बागुल यांनी केला आहे.

 

याबाबत बागूल यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना निवेदन दिले असून, त्यामध्ये मेट्रोची आखणी आणि विकास आराखड्यासंदर्भात काही शंका उपस्थित केल्या आहेत. भविष्यात प्रस्तावित रस्ते वेगळे दर्शविण्यात आले आहेत. महानगर पालिकेचे वाहतूक नियोजन अधिकारी मेट्रोच्या कामाबाबत अनभिज्ञ असल्याचे बागुल यांनी म्हटले आहे. याबाबत तज्ज्ञांकडून तात्काळ खुसाला करून, ट्रॅफिक प्लॅनर सेल निर्माण करावा अशी मागणी बागूल यांनी केली आहे.


खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर ते बरोबर करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: ProblemZone,   Business Category: NA   Similar News ID: 1000000052