VIDEO : 'पीएमआरडीए' कडून कात्रज भागात अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
Wednesday, Jun 6 2018 4:59PM    CHECKMATE TIMES
Tags: illegal construction razed, illegal school razed by pmrda, pmrda action against illegal school, unauthorized school razed in nimbalkarwadi, pmrda action against illegal constructions, action against illegal constructions in pune, illegal school razed in nimbalkarwadi, rajkumar shere, rajendra medank 1000006775

पुणे दि.५ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे. हवेली तालुक्यातील गुजर निंबाळकरवाडी येथे 'पीएमआरडीए' नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईत अनधिकृतपणे बांधण्यात येणाऱ्या नियोजित शाळेचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईत एकूण १६ हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

 

याबबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याठिकाणी आरसीसी स्वरुपात दोन मजली शाळेचे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात येत होते. संबंधित मालकांना 'पीएमआरडीए' कडून दोन वेळा नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत शाळेचे अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवण्यात आले होते. अखेर 'पीएमआरडीए' कडून मंगळवार (दि.५) रोजी या अनधिकृतपणे बांधण्यात येणाऱ्या नियोजित शाळेच्या बांधकामावर कारवाई करून, हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.

 

पीएमआरडीएचे पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे, उपअभियंता राजेंद्र मेदनकर, उपअभियंता सुर्यकांत कापसे, सहाय्यक अभियंता राजेश्वर मंडगे, यु. बी. लोखंडे, कनिष्ठ अभियंता योगेश दिघे, सुजय पाटील तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, सहायक पोलीस निरीक्षक अमोल काळे, पोलीस उपनिरीक्षक भोलेश्वर अहिवळे, तसेच स्थानिक पोलीस कर्मचारी यांच्या बंदोबस्तात ही कारवाई पार पाडण्यात आली.खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर अर्थात तुम्ही आमचे फेसबुक पेज अद्याप लाईक केलेले नाही. लाईक चिन्हावर क्लिक करून आमचे पेज लाईक करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Education,   Business Category: NA   Similar News ID: 1000000161