'एसआरए' च्या नावाखाली बिल्डरकडून रहिवाशांची फसवणूक
Wednesday, Jun 6 2018 1:41PM    CHECKMATE TIMES
Tags: sra scheme, slum rehabilitation scheme, protest against sra fraud, sra fraud in pune, bhimnagar sra fraud, kothrud sra fraud, rpi protest against sra fraud, bhimnagar slum kothrud, halim shaikh, rpi 1000006776

पुणे दि.६ (चेकमेट टाईम्स): कोथरूड पौड फाटा येथील भीमनगर झोपडपट्टीतील रहिवाशांची 'एसआरए' च्या नावाखाली बिल्डरने फसवणूक केल्याबद्दल तेथील रहिवाशांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हलीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली 'एसआरए' च्या कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घेतला.


याबाबत अधिक माहिती अशी की, पौड फाटा येथे रस्त्याचे काम चालू असून, यासाठी येथील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार होते, परंतु हे पुनर्वसन सध्या रहात असलेल्या ठिकाणापासून लांब असून, नोकरी आणि शिक्षणासाठी बाहेर पडणाऱ्यांची यामुळे गैरसोय होणार आहे. त्यामुळे या नागरिकांनी आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी केली आहे. तसेच या ठिकाणी ४० वर्षांपासून ३०० ते ३५० कुटुंब राहत आहेत. यातील ज्यांची घरे रस्त्याच्या कामात जाणार आहेत अशा नागरिकांचे पुनर्वसन होणार होते, परंतु पुनर्वसनासाठी बिल्डर या लोकांकडे विविध पुरावे मागून त्रास देत असल्याची तक्रार या नागरिकांनी 'एसआरए' अधिकाऱ्यांना केली असून, 'एसआरए' अधिकारी त्यांची तक्रार ऐकून घेतली नाही.

 

या ठिकाणी ३० ते ४० वर्ष जुनी अशी घरे आहेत आणि पुनर्वसन करण्यामध्ये या नागरिकांची जर गैरसोय होणार असेल तर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने 'एसआरए' कार्यालयासमोर मोठे आंदोलन करू असा इशारा हलीमा शेख यांनी दिला.खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर अर्थात तुम्ही आमचे फेसबुक पेज अद्याप लाईक केलेले नाही. लाईक चिन्हावर क्लिक करून आमचे पेज लाईक करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 12,   Business Category: NA   Similar News ID: 1000000063