पथदिवे बंद असल्याने पुणेकरांनी दिले क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कंदील भेट
Wednesday, Jun 6 2018 8:21PM    CHECKMATE TIMES
Tags: rajendra gorde, shrikant thackrey road, difficulties on shrikant thackrey road, incomplete work on shrikant thackrey road, shrikant thackrey road kothrud, shrikant thackrey road pune 1000006780

नागरिकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

 

 पुणे दि.६ (चेकमेट टाईम्स): पावसाळा तोंडावर आला असताना महानगर पालिकेकडून मात्र अनेक कामे अद्याप पूर्ण करण्यात आली नाहीत. कोथरूड भागातील श्रीकांत ठाकरे रस्त्यावर देखील अनेक कामे अपूर्ण असून, रस्त्यावरील विद्युत दिवे वारंवार बंद असतात. त्याचबरोबर स्मार्ट सिटी अंतर्गत पदपथाचे काम देखील अजून सुरुच आहे. ठाकरे रस्त्यावर फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून, त्यांची खूपच गैरसोय होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक राजेंद्र गोरडे यांकडून महानगर पालिका अधिकाऱ्यांना कंदील देऊन या गोष्टींचा निषेध करण्यात आला.

 

याबात अधिक माहिती अशी की, शहराच्या अनेक भागांत विद्युत वाहिन्यांची कामे अपूर्ण स्वरुपात आहेत. तसेच पाऊस सुरु होण्यास काहीच दिवस शिल्लक असल्याने ही कामे पूर्ण होणार का याबद्दल नागरिकांच्या मनात शंका आहेत. श्रीकांत ठाकरे रत्यावर देखील नागरिकांना अशाच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. विद्युत केबल नादुरुस्त असल्याने पथ दिवे बंद असून, एकाच रस्त्यावर दोन प्रकारे पदपथाचे काम सुरु आहे. तसेच या कामांसाठी लागणारे साहित्य रस्त्याच्या बाजूलाच ठेवले असल्याने अपघाताची देखील शक्यता निर्माण झाली आहे.

 

या सर्व पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक राजेंद्र गोरडे यांनी महानगर पालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन रस्ता समस्या मुक्त करण्याची मागणी केली. विद्युत पुरवठा नियमित करावा, पदपथ योग्य प्रकारे करावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी दत्ता भेगडे, रमेश उभे, साहेबराव पाटील उपस्थित होते. 

खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर अर्थात तुम्ही आमचे फेसबुक पेज अद्याप लाईक केलेले नाही. लाईक चिन्हावर क्लिक करून आमचे पेज लाईक करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
0   
0
प्रतिक्रिया
1000001732 Sangram   from  Pune     Jun 6 2018 9:21PM
ही स्टंटबाजी आहे.... स्वतः नगरसेवक असताना फोन करून किती वेळा लाईट घालवली ते सांगा.... जे विरोधात त्यांची लाईट बंद... इतर ठिकाळी कधीही लाईट जात नाही... पण आमचे दुर्देव्य की हे स्टंटबाजी करणारे आमच्याच रोडवर राहतात.... पण काय ...सतत अंधार व सतत स्टंटबाजी रात्री स्वतः लाईट बंद करून ही स्टंटबाजी चालु आहे..... निरंर्थक आहे... राजकारणासाठी नागरीकांना त्रास.....?  
  0     0
1000001733 Sangram   from  Pune     Jun 6 2018 9:22PM
ही स्टंटबाजी आहे.... स्वतः नगरसेवक असताना फोन करून किती वेळा लाईट घालवली ते सांगा.... जे विरोधात त्यांची लाईट बंद... इतर ठिकाळी कधीही लाईट जात नाही... पण आमचे दुर्देव्य की हे स्टंटबाजी करणारे आमच्याच रोडवर राहतात.... पण काय ...सतत अंधार व सतत स्टंटबाजी रात्री स्वतः लाईट बंद करून ही स्टंटबाजी चालु आहे..... निरंर्थक आहे... राजकारणासाठी नागरीकांना त्रास.....?  
  0     0
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 12,   Business Category: NA   Similar News ID: 1000000095