कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाच्या वडगाव पुलावर अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यु
Wednesday, Jun 13 2018 10:20AM    CHECKMATE TIMES
Tags: accident, katraj dehuroad bypass, vadgaon bridge, sinhgad road police, biker accident, biker died 1000006790

पुणे, दि.१३ (चेकमेट टाईम्स): कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाच्या वडगाव टप्प्यातील पुलावर आज सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संतोष धोंडीराम सावंत (वय.४० सद्या रा.बाणेर, मूळ-सातारा) अये अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. सावंत हे चांदणी चौकाकडून कात्रजच्या दिशेने जात असताना आज बुधवार (दि.१३) सकाळी आठच्या सुमारास वारजे ओलांडून वडगाव पुलावर आले असताना, त्यांच्या ताब्यातील स्प्लेंडर मोटारसायकलचा अपघात होऊन, त्यात त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दली आहे.

 

संग्रहित छायाचित्र

खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर अर्थात तुम्ही आमचे फेसबुक पेज अद्याप लाईक केलेले नाही. लाईक चिन्हावर क्लिक करून आमचे पेज लाईक करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 33,   Business Category: NA   Similar News ID: 1000000043