वारजे बाह्यवळण मार्गावर अपघातात दोघांचा मृत्यु; दोन जण जखमी
Wednesday, Jun 13 2018 12:40PM    CHECKMATE TIMES
Tags: accident, ikers accident, warje police, katraj dehuroad bypass, highway 1000006791

पुणे, दि.१३ (चेकमेट टाईम्स): वारजे मधून गेलेल्या कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रणजीत ब्रिजेश कमल (वय.२६ रा.वारजे) आणि श्रीकांत चौधरी (वय.३२ रा. वारजे माळवाडी, पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे असून, अविनाश मनोहर जोगदंड (वय.२७ रा.दांगट इस्टेट, शिवणे, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अविनाश जोगदंड आणि मयत ब्रिजेश कमल याच्यासह आणखीन एक मित्र असे तिघेजण वारजे चौकाकडून चांदणी चौकाच्या दिशेने कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाच्या सेवा रस्त्याने जात असताना, पॉप्युलर नगर समोरील, स्पंदन इमारतीजवळ पुलाच्या कामासाठी नव्याने आणून टाकलेल्या मोठ्या सिमेंट पाईपला रात्री ९ च्या सुमारास अविनाश चालवत असलेल्या दुचाकीचा हॅडल लागून त्यात मागे बसलेल्या ब्रीजेशच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ब्रिजेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर अविनाश याच्यासह त्यांच्या आणखीन एका मित्रावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

ब्रिजेश याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेबाबत अविनाश जोगदंड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्याच्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असल्याने, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस शिपाई ए. व्ही. सावंत यांनी याबाबत वारजे पोलिसात तक्रार दिली आहे.

 

तर हा अपघात झालेल्या ठिकाणच्या विरुद्ध बाजूस असलेल्या हॉटेल राजमुद्रा समोर रस्ता ओलांडत असताना, ट्रकने चिरडल्याने झालेल्या अपघातात श्रीकांत चौधरी या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात रात्री एक ते दीडच्या सुमारास घडला. याबाबत ट्रकचालकाला वारजे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

सदरील दोन्ही अपघात झालेल्या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम चालू असून, तेथे सुरक्षारक्षक नेमण्यात आलेले आहेत. मात्र ब्रिजेशचा मृत्यू झालेल्या ठिकाणी टाकण्यात आलेले ते सिमेंट पाईप रस्त्याच्या एकदम कडेला टाकण्यात आलेले असून, तिथे रस्ता निमुळता होत असल्याने अनेक वेगवान वह्ने समोरासमोर येऊन अपघात नित्याचे झालेले असतानाच, नव्याने टाकण्यात आलेल्या या सिमेंट पाईपला धोक्याचा इशारा देणारे कोणतेही फलक अथवा रिफ्लेक्टर लावण्यात आलेले नाहीत.

 

त्यामुळे रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशझोतात पाईप न दिसल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज नागरिक वर्तवत होते. तर आणखीन अपघात आणि मृत्यू होण्यापूर्वी त्या ठिकाणी धोक्याचा इशारा देणारे फलक, सुरक्षा कठडे लावण्यात यावेत, अथवा ते पाईप तेथून इतरत्र हलवावेत अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

 

 

खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर अर्थात तुम्ही आमचे फेसबुक पेज अद्याप लाईक केलेले नाही. लाईक चिन्हावर क्लिक करून आमचे पेज लाईक करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 32,   Business Category: NA   Similar News ID: 1000000043