कोंढव्यात सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश; दोन मुलींची सुटका
Saturday, Jun 16 2018 10:47AM    CHECKMATE TIMES
Tags: sex racket, illegal sex work, police rade, kondhawa, social justice, pune sex workers 1000006792

पुणे, दि.१६ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरात सद्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे समोर येत असून, पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कोंढव्यातील रहिवासी संकुलात छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली तर एकाला ताब्यात घेतले आहे.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय पांडुरग सूर्यवंशी (वय ३८) असे सेक्स रॅकेट चालवणाऱ्याचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. तर दोन मुलींची सुटका करण्यात आली असून, त्यांना महंमदवाडी येथील रेस्क्यु होममध्ये ठेवण्यात आले आहे.

 

धनंजय सूर्यवंशी कोंढव्यातील जरांडे नगर मध्ये असलेल्या हेवन पार्क इमारतीत वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस नाईक नितीन तेलंगे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने कारवाई करत हेवन पार्क येथील फ्लॅटवरवर छापा टाकत, कारवाई केली. धनंजय सूर्यवंशी याच्यावर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 


खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर अर्थात तुम्ही आमचे फेसबुक पेज अद्याप लाईक केलेले नाही. लाईक चिन्हावर क्लिक करून आमचे पेज लाईक करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
\

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 27,   Business Category: NA   Similar News ID: 1000000160