राजमुद्रा हॉटेलचे मालक अमर कणसे यांची आत्महत्या
Tuesday, Jun 19 2018 12:38PM    CHECKMATE TIMES
Tags: Suicide, amar kanse, hotel rajmudra , garje police 1000006794
पुणे, दि.१९ (चेकमेट टाईम्स): वारजे मधील कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर असलेल्या राजमुद्रा हॉटेलचे मालक अमर कणसे यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. वारजे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. 

अमर कणसे हे वारजे माळवाडी भागात मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने हॉटेल व्यवसायात पुढे आले आहेत. कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्गावर त्यांचे परमिट रूम बिअर बार आहे. काही महिन्यांपूर्वी शासनाने महामार्गाच्या ५०० मीटर अंतरात दारू विक्रीला बंदी घातली होती. मात्र एवढा कठीण समय आलेला असताना देखील अमर कणसे यांनी न डगमगता, आलेल्या शासन निर्णयाचे स्वागत केले होते.

कालपरत्वे शासन निर्णयात बदल झाले आणि त्यांचे हॉटेल पुन्हा पूर्ववत चालू झाले. मग आता सर्व सुरळीत चालू झाले असताना देखील अमर कणसे यांनी आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. त्यांचा मोठा मित्रपरिवार असून, सर्वजण अमर हा आत्महत्या करणारा तरुण नव्हता, असे मत व्यक्त करत आहेत. त्यामुळे अमर कणसे याची ही आत्महत्या का घातपात असा संशय मित्र परिवारातून व्यक्त होतो आहे. याबाबत वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून, समांतर तपास चालू आहे.

खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर अर्थात तुम्ही आमचे फेसबुक पेज अद्याप लाईक केलेले नाही. लाईक चिन्हावर क्लिक करून आमचे पेज लाईक करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
81   
1
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 32,   Business Category: NA   Similar News ID: 1000000044