कोथरूड मध्ये भल्या पहाटे एका तरुणाचा खून
Tuesday, Jul 10 2018 12:25PM    CHECKMATE TIMES
Tags: murder, murder in kothrud, paud road, lohiya jain it park, kothrud police 1000006795

पुणे, दि.१० (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील सांस्कृतिक भाग असलेल्या कोथरूड मध्ये आज मंगळवार (दि.१०) भल्या पहाटे एका तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली असून, पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना संशयावरून ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्षय बाळासाहेब जोरी असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, संकेत शिंदे, आशिष पोकळे, प्रशांत ओंबळे, सुशांत ओंबळे असे संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत.

 

आज मंगळवार (दि.१०) पहाटे पावणे पाचच्या सुमारास कोथरूड, पौड रस्त्यावरील, चांदणी चौकाजवळ असलेल्या लोहिया जैन आयटी पार्क मागे ही घटना घडली असून, डोक्यात बाटली मारून अक्षय जोरी याचा खून केल्याचे समोर आले आहे. मात्र खुनाचे कारण काय याबाबत तपास चालू आहे. खुनाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत, तपासाचे मार्गदर्शन केले.

 

 

खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर अर्थात तुम्ही आमचे फेसबुक पेज अद्याप लाईक केलेले नाही. लाईक चिन्हावर क्लिक करून आमचे पेज लाईक करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
72   
0
प्रतिक्रिया
1000001748 altaf khan   from  pune     Jul 11 2018 12:11PM
hindi  
  0     0
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 10,   Business Category: NA   Similar News ID: 1000000045