खडकवासला धरणातून ५ हजार क्युसेक वेगाने मुठेत पाणी सोडले
Monday, Jul 16 2018 1:12PM    CHECKMATE TIMES
Tags: khadakwasla, pune rain, mutha river, flood 1000006796

दुपारी ९ हजार पर्यंत वाढ होणार

 

पुणे, दि.१६ (चेकमेट टाईम्स): खडकवासला धरणात आज सोमवार (दि.१६) संततधार पाऊस पडत असून, सकाळी ८, सकाळी १० नंतर आता दुपारी १ वाजता पुन्हा मुठेत सोडण्यात आलेल्या पाण्यात वाढ करण्यात आली असून, ५ हजार १३६ क्युसेक वेगाने पाणी मुठेत सोडण्यात आले आहे. तर दुपारी ३ वाजता आणखीन विसर्ग वाढवून तो ९ हजार क्युसेक पर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी १ नंतर शिवणे नांदेड पूल पाण्याखाली कधीही पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

सकाळी सहा वाजता खडकवासला धरण १०० टक्के भरल्यानंतर, सकाळी आठ वाजता मुठा नदीत १ हजार ८१२ क्यूसेक वेगाने पाणी सोडले होते. त्यानंतर दहा वाजता २ हजार ४२४ क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. तर आता दुपारी १ वाजता त्यात आणखीन वाढ करण्यात आली असून, ५ हजार १३६ क्युसेक वेगाने पाणी मुठेत सोडण्यात येत आहे.

 

दरम्यान, सकाळी सात वाजता खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, शाखा अभियंता राजकुमार क्षीरसागर, तांत्रिक सहायक डी एम. भागवत यांनी खडकवासला धरणात जलपूजन करून, त्यानंतर मुठेत पाणी सोडण्यात आले.

 

संग्रहित व्हिडीओ, यावर्षीचा व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब channel ला सबस्क्राईब करा.

खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर अर्थात तुम्ही आमचे फेसबुक पेज अद्याप लाईक केलेले नाही. लाईक चिन्हावर क्लिक करून आमचे पेज लाईक करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. 

36   
0
प्रतिक्रिया
1000001749 Abhijeet talekar   from  Pune     Jul 16 2018 1:51PM
Mast  
  0     0
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Agriculture,   Business Category: NA   Similar News ID: 1000000053