रस्त्यावरील बेवारस, निराधार चिमुरड्यांसह यांनी केला स्वातंत्र्यदिन साजरा
Saturday, Aug 25 2018 8:05PM    CHECKMATE TIMES
Tags: independence day, orphan age, sinhgad road, slum boys 1000006799

पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): स्वातंत्र्यदिन गल्लीपासून दिल्लीपर्यंतच नव्हे तर जगभर साजरा केला जातो. त्यासाठी अनेकजण निरनिराळ्या पद्धतीने आपला सहभाग नोंदवत असतात. असाच एक सहभाग पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील मुलांनी नोंदवला असून, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडकेच असे. सिंहगड रस्त्यावरील एका झोपडपट्टीत वाढलेल्या मुलांनी टिंगलटवाळी करण्यापेक्षा एक चांगला आदर्श घालून देण्याचा प्रयत्न करत, रस्त्यावरील अनाथ, वंचित मुलांबरोबर स्वातंत्र्यदिन साजरा केल्याचे पहायला मिळाले.

 

गेले काही महिन्यापासून पुण्यामध्ये फ्रेंड्स फॉरेवर ग्रुप अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे. झोपडपट्टी मधील हि तरु मुल आपण काहितरी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, या उद्देशाने झोपडपट्टी मध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलामुलींच्या घरी जाऊन शैक्षणिक साहित्य देऊन कौतुक समारंभ,  मैत्रीदिना निमित्त वृक्षारोपण,  रस्त्यावरिल मुलांना, अनाथांना कपडे खाऊ वाटप असे उपक्रम राबवताना दिसत आहे.

 

याबाबत सांगताना ग्रुप मधील मुले सांगतात की, आम्ही झोपडपट्टीमध्ये राहतो, लोक म्हणतात की हि मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात. मात्र आमची परिस्थिती आम्हाला या मार्गावर आणते. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी फ्रेंड्स फॉरेवर ग्रुप कार्यरत असून, आमच्या कडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, नव्हे तर सर्वच झोपडपट्टी मधील मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे ग्रुप सदस्यांनी सांगितले. त्यासाठी ग्रुप मधील ही मुल काम, धन्दाम नोकरी करून स्वत:सह कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत आहेतच, शिवाय समाजाप्रती आपले काहीतरी देणे लागते, या जाणीवेतून आपल्या घासातील घास गरजवंताला पोचवण्याचे मोलाचे कार्य करताना दिसत आहेत.

 

सिंहगड रस्त्यावरील करण सुर्यवंशी, अमर जंगम, ओमकार गोळे, भावेश मांडवकर, प्रदिप सावंत, अनिकेत सर्कले, संकेत कदम, राज जंगम, मंगेश मोरे, अभिषेक जंगम, प्रेम शाहपालक, सनी वर्मा, रोहित कवडे, अंकेश पांडव, संकेत हंपागोळ आदी मुले यामध्ये मोलाचे योगदान देत आहेत.


खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर अर्थात तुम्ही आमचे फेसबुक पेज अद्याप लाईक केलेले नाही. लाईक चिन्हावर क्लिक करून आमचे पेज लाईक करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. 
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 33,   Business Category: NA   Similar News ID: 1000000107