दहीहंडीच्या फ्लेक्स वरून वाद; सिंहगड रस्त्यावर एकाचा निघृण खून
Saturday, Sep 1 2018 8:14PM    CHECKMATE TIMES
Tags: murder, murder on sinhgad road, dahihandi, flex banner, akshay ghadashi, sagar darvatkar 1000006800

पुणे, दि.१ (चेकमेट टाईम्स): दहिहंडी असेल की गणेशोत्सव असेल, आता दिवसेंदिवस या उत्सवांचे स्वरूप, शक्तीप्रदर्शन आणि हेवेदाव्यांमध्ये होत असून, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आलेल्या दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरून तरुणांमध्ये झालेल्या वादातून एकावर तलवारीने वार करून एकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्षय घडशी (वय २३, रा. नॅशनल पार्क सोसायटी, माणिकबाग, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी निलेश चौधरी, सागर दारवटकर व त्यांच्या ३ साथीदारांवर सिंहगड रस्ता पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

काही दिवसांपूर्वी अक्षय घडशी आणि हल्लेखोरांमध्ये दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरून वाद झाला होता. त्या वादातून ५ जणांच्या टोळक्याने आज शनिवार पहाटे सिंहगड रस्त्यावर, माणिकबाग येथील पेट्रोल पंपासमोर अक्षयला गाठून त्याच्यावर तलवारीने वार करून खून केला. अक्षय घडशी आणि मित्र परिवाराच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा चौकात “फ्रेंड्स ग्रुप” आखिल सिंहगड रोड दहीहंडी उत्सव नावाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

 

खालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का? नसेल तर अर्थात तुम्ही आमचे फेसबुक पेज अद्याप लाईक केलेले नाही. लाईक चिन्हावर क्लिक करून आमचे पेज लाईक करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
27   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 33,   Business Category: NA   Similar News ID: 1000000045