तुळजापूर पायी वारीतील भक्तांना फलाहाराचा महाप्रसाद
Saturday, Oct 13 2018 4:16PM    CHECKMATE TIMES
Tags: kojagari, prashant mane 1000006801

एसपी ग्रुप, लोकनेते सुभाष पाटील युवा मंचचा उपक्रम 

सोलापूरदि.१३ (CTNN): दरवर्षी नवरात्री निमित्त महाराष्ट्रासह देशभरात मोठ मोठे उत्सव साजरे होत असतात. मात्र नवरात्री नंतर कोजागरी पौर्णिमेला तुळजापूर यात्रा भरते. यावेळी लाखो भाविक सोलापूर ते तुळजापूर पायी चालत जातात. अशा भाविक भक्तांना सोलापूर मधील सामाजिक संघटना एसपी ग्रुप आणि सुभाष पाटील युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच वर्षांपासून मोफत अन्नदान उपक्रम राबवण्यात येतो आहे. त्यात यंदा भर घालत भाविक भक्तांना सफरचंद आणि इतर फळे देखील वाटण्यात येणार असून, फलाहाराचा आस्वाद भाविक घेणार आहेत.

 

याबाबत सुभाष पाटील युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत माने यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. तुळजापूरच्या या सोहळ्याला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातून देखील मोठ्या संख्येने भक्तगण येत असतात. त्यांचा हा पायी प्रवास सुखकर व्हावा म्हणून अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात येतो. त्यात प्रामुख्याने जेवणासह फळे आणि शुद्ध पाण्याच्या बाटल्यांचे देखील वाटप करण्यात येते. यावर्षी हा सोहळा मंगळवार (दि.२३) ते गुरुवार (दि.२५) ऑक्टोबर असा सलग तीन दिवस, हिप्परगी गावाच्या हद्दीत राबवण्यात येणार आहे. त्याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

दिवंगत सुभाष पाटील हे हा उपक्रम राबवत होते. मात्र त्यांच्या निधनानंतर हा वारसा २०१४ पासून एसपी ग्रुपचे संस्थापक नरेंद्र गायकवाड, सचिन सावंत आणि प्रशांत माने हे राबवत आहेत. तर श्वासात श्वास असेपर्यंत हा उपक्रम सुरु राहील असेही माने यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी आबा कांबळे, प्रीतम जाधव, हेमंत शेडगे, अमोल धावडे, नितीन दुधाने, प्रसाद ढेणे, बालाजी माने, अक्षय माने, नरेश घोरपडे, मुकेश अंटद, नारायण साठे, पायल वाघमारे, विकास जाधव, बापू पायाळ, अक्षय सोनावणे,निलेश राठोड, प्रखर पांडे, वचन कांबळे, डॉ. रोहित बोरकर, आशुतोष कल्याणी, नवनाथ काळे, नाना खरात, रामेश्वर कोळेकर, बालाजी बल्ला, राजा भंडारी, प्रज्वल पवार, रोहन शिंदे, विशाल कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यशस्वी करण्यासाठी कष्ट घेत असल्याचे माने यांनी सांगितले आहे.

 

विशेष म्हणजे डॅडी म्हणून परिचित असलेल्या अरुण गवळी यांच्यासह पुण्यातील नगरसेवक दीपक मानकर यांच्या सुटकेसाठी डॅडी भक्त सागर माने हे देखील सोलापूर पासून असंख्य कार्यकर्त्यांसह तुळजापूरला पायी जाणार असल्याचे त्यांनी चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले.


9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Solapur,   Country: India,
News Category: SocialWork,   Business Category: NA   Similar News ID: 1000000066