कॉंग्रेसची पुण्यात आढावा बैठक होणार; लोकसभेची जागा राखून ठेवण्यासाठी कॉंग्रेस एक
Thursday, Nov 15 2018 6:09PM    CTNN
Tags: congress, congress meeting, pune loksabha, congress bhavan, pune politics, ashok chavan, congress leaders in pune, election 2019, pune loksabha election 1000006802

पुणे, दि.१५ (चेकमेट टाईम्स): आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पश्‍चिम महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांतील इच्छुकांची आढावा बैठक पुण्यात बोलवली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच रहावा यासाठी सर्व इच्छुक या बैठकीत आग्रही भूमिका मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

 

तीन दिवसांच्या या आढावा बैठकांमध्ये गुरुवार पासून सुरु होणाऱ्या या बैठकीत पश्‍चिम महाराष्ट्रातील मतदारसंघाचा समावेश आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी शहर काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी गत आठवड्यात शहर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला जात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही जागा राष्ट्रवादीकडे जाऊ नये यासाठी शहर काँग्रेसचे सर्व इच्छुक आणि पदाधिकारी एकत्र आले आहेत.

 

या इच्छुकांमध्ये माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेसच्या आढावा बैठकीत सर्व इच्छुक पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडू नये यासाठी आग्रही भूमिका मांडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Politics,   Business Category: NA   Similar News ID: 1000000003