हाजीअली नंतर आता निजामुद्दीन दर्ग्यात प्रवेशासाठी महिलांची याचिका
Wednesday, Dec 12 2018 3:24PM    CTNN
Tags: pune,nijammuddin dargah. 1000006880

पुणे,दि.१२(चेकमेट टाईम्स): येथील निजामुद्दीन आवलिया दर्ग्यात महिलांच्या प्रवेशावर असलेल्या बंदीबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकार, दिल्ली पोलीस आयुक्त, कायदा मंत्रालय, हजरत  

निजामुद्दीन आवलिया ट्रस्ट आदींना नोटीस जारी केलेली आहे. पुणे येथील विधी शाखेच्या काही विद्यार्थिनींनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने नोटीस जारी केलेली आहे. या विद्यार्थिनींनी दाखल केलेल्या दावा याचिकेत दर्ग्याबाहेर बोर्डवर हिंदी व इंग्रजीत दर्ग्यात महिलांना प्रवेश नाही असे लिहिले असल्याचे म्हटले आहे.

 

या याचिकेत विद्यार्थिनींनी म्हटले आहे की,२७ नोव्हेंबरला त्या विद्यार्थिनी दर्ग्यात गेल्या होत्या, तेव्हा त्यांना या दग्र्यात महिलांना प्रवेशबंदी असल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी दिल्ली पोलीस आणि दर्गा व्यवस्थापन पाहणाऱ्या ट्रस्टला दर्ग्यात प्रवेशासाठी विनंती केली; परंतु त्यांना कसलेही उत्तर मिळाले नाही. यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थिनींनी आपल्या याचिकेत महिलांना दर्ग्यात प्रवेश करू देण्याचे आदेश केंद्र, दिल्ली सरकार, पोलीस व्यवस्थापन आणि दर्गा ट्रस्ट या सर्वांना द्यावेत, असे म्हणत महिलांना प्रवेश करण्यापासून थांबवणे घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. वकील कमलेश कुमार मिश्रा यांच्यामार्फत दाखल केलेल्या या याचिकेतून केंद्र, दिल्ली सरकार, पोलीस प्रशासन आणि दर्गा ट्रस्टने महिलांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावी आणि महिलांच्या प्रवेशाच्या परवानगीवर बंदी घटनाबाह्य घोषित करावी, अशी मागणी केली आहे.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000130