‘चाकण दंगलीमध्ये मराठा आंदोलकांचा सहभाग नाही:पोलीस आयुक्त.
Thursday, Dec 13 2018 2:10PM    CTNN
Tags: maratha kranti morcha,dangal,pune,pimpri. 1000006895

पिंपरी

 

पुणे,दि.१३(चेकमेट टाईम्स): चाकण येथील मराठा आंदोलना दरम्यान उसळलेल्या हिंसाचाराशी मराठा आंदोलकांचा कसलाच संबंध नाही, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली आहे. 

 

आयुक्‍त पद्मनाभन म्हणाले की, चाकण येथे 30 जुलै रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून आंदोलन झाले. हे आंदोलन दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान संपले होते. त्यानंतर काही समाजकंटकांनी मराठा आंदोलनाच्या नावाखाली हिंसक कारवाया केल्या.  त्या ठिकाणी तोडफोड करणार्‍यांचे फोटो आणि चित्रफीत पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यानुसार कारवाई करण्यास सुरवात केली आहे. मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणार्‍यांचे फोटो दाखविले. त्यावेळी ते तरुण आमचा कार्यकर्ता नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे चाकण हिंसाचाराशी मराठा आंदोलकांचा संबंध नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

 

 

 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006