सिंहगड रोड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
Friday, Jan 18 2019 5:36PM    CTNN
Tags: pune,singhgad road ,crime,murder,wadgav bridge,police singhgad road 1000007262

पुणे,दि.१८(चेकमेट टाईम्स): घटनेबाबत अधिक माहिती अशी कि दि.१५/१/२०१९ रोजी फान टाईम थीएटर शेजारी वडगाव पुलाखाली  बंदीस्त पाण्याच्या पाईपलाईनच्या कॅनॉलमध्ये १०-१५ फुट खोल खड्ड्यात एक अंदाजे २५ टे ३० वयोगटातील अज्ञात इसमचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळून आलेला होता. सदर ठिकाणी सिंहगड रोड पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली असता सदर व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून झाला असल्याची खात्री झालि होती.मृतदेहाची कोणतीही ओळख पटत नव्हती व चेहरा पूर्णपणे विद्रूप होऊन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.

 

 

कोणताही  पुरवा हाती लागला  नसताना सदर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा छडा लावण्याकरिता सदर मृतदेहाच्या उजव्या हाताच्या मनगटावर त्रिशूल ,डमरू ओम व खांद्यावर शिव शंकर त्रिशूल असलेला असे गोंदलेले एवढीच ओळख मयत इसमानाची होती. सर्व शक्यता गृहीत धरून सदर अनोळखी मृत इसमानाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत असताना तपास पथकातील अधिकारी/कर्मचारी यांना एका कचरा वेचकाकडून मृत व्यक्तीच्या हातावर गोंद्लेल्या प्रकारावरून ती व्यक्ती त्याच्या परिचयातील हरी उर्फ गुद्ड्या असावी याबाबत माहिती दिली त्यावरू सदर व्यक्तीबाबत माहिती घेत असताना ज्या ठिकाणी मृतदेह मिळून आला त्या ठिकाणी काही मुळे दारू पिण्यास बसतात या बाबतची माहिती तपास पथकातील अधिकारी/कर्मचारी यांना बात्मिदारामार्फत मिळाली. त्यावरून सदर ०३ विधीसंघर्षित मुलांना ताब्यात घेतले असता त्यांनी नमूद गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्यांना सदर इसमास ठार मार्ण्याबाब्त्चे कारण विचारले असता त्यांनी सांगितले कि सुमारे ६ ते ७ दिवसांपूर्वी सदर तिन्ही संघर्षित मुले हि वडगाव पुलाखाली बंदिस्त पाण्याच्या पाईपलाइनच्या कॅनॉलमध्ये दारू पिण्यास बसले होते त्यावेळी मृत इसम हा देखील त्या ठिकाणी दारू पिण्यास आला त्यावेळी मृत इसमाने त्यातील एकास आणखी दारू आणण्यासाठी पैसे दिले त्याने दारू आणली परंतु मृत व्यक्तीने दिलेले पैसे परत दिले नाहीत म्हणून मृत व्यक्ती हरी उर्फ गुद्ड्या याची व तिन्ही मुलांची झटापट झाली त्यातील एकाने आधी मृत व्यक्तीच्या डोक्यात दगड घातला व त्यानंतर इतर दोघांनी देखील प्रत्येकी एक एक मोठा दगड त्याच्या डोक्यात घातले व त्यानंतर सदर तिन्ही विधीसंघर्षित बालके सदर ठिकाणहून पळून गेले.नमूद तिन्ही विधीसंघर्षीत बालकांकडे अधिक तपास सुरु आहे.

 

यापुढील तपास  श्री.रविंद्र सेनगावकर अपर पोलीस आयुक्त पश्च्चीम प्रादेशिक विभाग श्री.मंगेश शिंदे ,पोलीस उप-आयुक्त ,परिमंडळ ३,श्री.बाजीराव मोहिते ,सहा पोलीस आयुक्त ,सिंहगड रोड विभाग ,श्री.सरदार पाटील ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,सिहगड रोड पोलीस स्टेशन ,सौ.संगीता यादव,पोलीस निरीक्षक (गुन्हे ) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी गडकरी ,पोलीस उप-निरीक्षक गिरीष सोनवणे ,पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे ,दयानंद तेलंगे पाटील,योगेश झेंडे,पुरुषोत्तम गुन्ला ,रफीक नदाफ ,यशवंत ओंबासे ,संतोष सावंत ,मयूर शिंदे ,राहुल शेंडगे ,अविनाश कोंडे, सचिन माळवे,निलेश कुलथे ,निलेश जमदाडे ,किशोर शिंदे, प्रशांत काकडे ,संदीप पवार , यांनी केला .

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000045