मणिभाई देसाई शाळेची भिंत कोसळून एक विद्यार्थी ठार
Friday, Jan 18 2019 6:45PM    CTNN
Tags: amravati,school,accident,mnibhai desai school accident,student death 1000007264

अमरावती, दि.१८ (चेकमेट टाईम्स): अमरावतीमधील भातकुली तालुक्यात मणिबाई छगनलाल देसाई विद्यालय शाळेची भिंत कोसळून आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भातकुली तालुक्यातील आष्टी गावात ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत.

 

भातकुली तालुक्यातील आष्टी येथे मणिबाई छगनलाल देसाई विद्यालय असून या विद्यालयाची भिंत दुपारी एकच्या सुमारास कोसळली. यात वैभव गावंडे या १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे, तो इयत्ता आठवीत शिकत होता. जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने आष्टी येथे तणावाचे वातावरण पसरले आहे. आष्टी येथे आजूबाजूच्या गावांमधून अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. जखमी विद्यार्थ्यांपैकी दोघे जण देवरी आणि अनकवाडी येथील आहेत.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Amravati,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000043