दारू पिण्याच्या वादातून एकाचा खून सहा जणांना जन्मठेप
Saturday, Jan 19 2019 12:36PM    CTNN
Tags: pune,bhosri,crime,murder,court,pune life imprisonment six people in murder and attempt to murder 1000007266

पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): दारू पिण्याच्या वादातून एकाचा खून केला गेला आणि या प्रकरणी  आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी सहा जणांना जन्मठेप आणि 15 हजार रुपये प्रत्येकी दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रकमेपैकी 30 हजार रुपये मृताच्या कुटुंबियांना तर दोन जखमींना 30 हजार रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

 

नागेश साहेबराव गायकवाड (वय 20), महेश उर्फ जॅकी मछिंद्र कांबळे (वय 19) , ओंकार सचिन बांदल (23), विकी बबन ओव्हाळ (20), दीपक श्रीरंग शिंदे (२९, पाचही रा. बालाजी नगर, भोसरी) आणि राजू भीमराव हाके (21, आदर्शनगर, मोशी) अशी या शिक्षा झालेल्या सहा जणांची नावे आहेत. रामा भीमराव गोटे (19, बाळजीनगर, भोसरी) यांचा खून तर राजेश मनोहर स्वामी (19, दापोडी), लखनकुमार गायकवाड (19, बालाजीनगर, भोसरी) यांच्या खुनाचा देखील प्रयत्न करण्यात आला होता. याबाबत जखमी राजेश मनोहर स्वामी यांनी फिर्याद दिली होती.

 

हि घटना 14 फेब्रुवारी 2015 रोजी घडली. खटल्यात सरकारी वकील सुनील हांडे यांनी पंधरा साक्षीदार तपासले. त्यांना कोर्टकामी पोलिस हवालदार दादासाहेब पांडुळे आणि पोलिस हवालदार नारायण पवार यांनी देखील मदत केली. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी केला आहे. 

 

घटनेच्या दिवशी जखमी स्वामी, गायकवाड आणि रामा गोटे तसेच आरोपी दीपक शिंदे आणि राजू हाके तसेच भोसरी एमआयडीसी जवळच असलेल्या संकेत हॉटेलमध्ये दारू पीत बसले होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. त्यावेळी बिल न देताच सर्व जण निघून गेले. त्यावेळी गोटेसह तिघे समझोत्यासह बालाजीनगरकडे जात असताना धारधार हत्यारासह उभ्या असलेल्या आरोपींनी तिघांवर सपासप वार करून गोटेचा खून केला. तर स्वामी आणि गायकवाड यांना गंभीर जखमी केले. आरोपींच्या या कृत्यामुळे भोसरी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

 

याबाबत सहा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. दरम्यान जखमी लखन गायकवाड याने केस मागे घ्यावी म्हणून त्याच्या आईवर आरोपी राजू हाकेच्या भावाने वार केले होते. त्याबद्दल गुन्ह्याही दाखल झाला होता. खटल्यात सरकारी वकील हांडे यांनी जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली.  खटल्यात जखमींची, वैद्यकीय पुरावा, रासायनिक विश्लेषकाचा अहवाल महत्वाचा ठरला. 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000045