बेजबाबदार अधिकारी व डॉक्टरांवर कारवाई कोण करणार..?
Saturday, Jan 19 2019 1:08PM    CTNN
Tags: pune,hospital,doctor,mistake,child life,due to the mistake of the doctor the life of 22 days old child is in danger 1000007268

पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांच्या चुकीमुळे 22 दिवसांच्या बाळाचा जीव हा धोक्यात आला आहे. इंजेक्शन दिल्यामुळे बाळाला गाठ आली आहे.  रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्या ठिकाणी जखम होऊन बाळाला संसर्ग झाला असल्याचे कळाले. त्याबाबत तक्रार केली म्हणून डॉक्टरांकडून संबंधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उद्धट बोलले जात होते. त्यामुळे या बेजबाबदार अधिकारी व डॉक्टरांवर कारवाई कोण करणार, असा सवाल नातेवाईक विचारत आहेत.  

 

नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात एक महिला बाळंतपणासाठी दाखल झाली होती. उपचारास योग्य प्रतिसाद देत नसल्याचे सांगून संबंधित महिलेला डॉक्टरांकडून उद्धटपणे बोलले जात होते. बाळाच्या जन्मानंतर चौथ्या दिवशी इंजेक्शन देण्यात आले. इंजेक्शन दिल्यानंतर बाळाला गाठ आली. त्यानंतर शस्त्रक्रिया करून गाठ काढावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शस्त्रक्रिया केल्यानंतर गाठ आलेल्या ठिकाणी जखम झाली आहे. त्या जखमेमध्ये संसर्ग झाला. त्याबाबत संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रमुखांकडे तक्रार केली. या वेळी त्यांना दुसर्‍या रुग्णालयात उपचार करण्यासाठी दबाव आणला गेला. 

 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004