बनावट नोटा छापून चलनात आणणार्‍या एका बड्या रॅकेटचा पर्दाफाश
Saturday, Jan 19 2019 1:28PM    CTNN
Tags: pune,crime,tamilnadu,fake currency,raid,notes press,raid on fake currency notes press in pune 1000007269

पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तमिळनाडूतील खोट्या बनावट नोटा छापून त्या इतर वेगवेगळ्या शहरांमध्ये चलनात आणणार्‍या एका बड्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पुण्यातील कुख्यात गुन्हेगाराचा हा छापखाना असल्याचे उघडकीस आले आहे तसेच, यात दोन महिलांसह सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वा चार लाखांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोटाप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला एक जण यूट्यूब पाहून बनावट नोटा बनवण्यास शिकला. पुण्यातील रेकॉर्डवरील तो गुन्‍हेगार असून तमिळनाडूत नोटा तयार करून तो पुणे आणि परिसरात आणून देत होता. 

 

अटक केलेल्यांची नावे - राजेश चंद्रभान ढिलोड (वय 45, रा. रामवाडी पोलिस चौकीसमोर, नगर रोड), अलका रोहिदास क्षीरसागर (वय 44, रा. ताडीवाला रोड), आनंद यशवंत जाधव (वय 36, रा. मंचर), त्याची पत्नी सुनीता आनंद जाधव (वय 30) आणि व्यंकटेश सुब्रमण्यम मुदलीयार (वय 44, रा. तमिळनाडू) , श्रीहरी नायर हा पसार झाला आहे.

 

गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील सहायक फौजदार अनिल ऊसुलकर यांना  मिळालेल्या माहितीवरून पोलिस आयुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार, अतुल गायकवाड व त्यांचे पथकाने यांनी टाकलेल्या छाप्यात राजेश ढिलोड व अलका क्षीरसागर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील 2 हजाराचे 55 500 च्या 104 अशा एकूण 1 लाख 62 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून अटक केली.  न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मिळाली. तपासात आनंद व त्याची पत्नी सुनीता यांची नावे समोर आली. यानंतर या दोघांना अटक करून त्यांच्याकडून 24 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या. चौघांकडील चौकशीत  व्यंकटेश मुदलीयार व श्रीहरी नायर हे दोघे तमिळनाडूत बनावट नोटा छापून येथे चालविण्यासाठी पाठवित असल्याचे निष्पन्न झाले. एक पथकाने तमिळनाडूतील चेन्नै गावात जाऊन व्यंकटेश याच्या घरावर मध्यरात्री छापा टाकला. त्यावेळी आरोपी बनावट नोटा छापत होता. या वेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तसेच, नोटा छापण्यासाठी लागणारे सर्व साहित्यही जप्त केले. तर, छापलेल्या 2 लाख 35 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. 

 

व्यंकटेश हा मूळचा पुण्याचाच आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे जसे खून, मारामारी, पेट्रोल भेसळ यांसह गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2001 मध्ये येरवड्यात झालेल्या एका पत्रकाराच्या हत्येतील तोसुद्धा एक आरोपी आहे. जामिनावर आल्यापासून तो फरार आहे. कर्ज घेऊन त्याने एक ट्रक घेतले. यातून तो लाकडांची वाहतूक करीत होता. पण, वनविभागाने तेव्हाही त्याला पकडले. यामुळे तो तोट्यात गेला. यानंतर त्याने बनावट नोटा छापण्याची योजना आखली. यासाठी तो यूट्यूबवर पाहून नोटा तयार करू लागला. तो पुण्यात फक्त श्रीहरीच्या संपर्कात होता. त्यांच्याकडे बनावट नोटा आणून देत असे. एक लाख बनावट नोटा दिल्यानंतर त्यामध्ये फक्त चाळीस हजार रुपये खरे घेत होता. दर पंधरा दिवसांनी येऊन तो पैसे पुण्यात देत असल्याचे समोर आले आहे.

 

 

जवळपास दहा लाख बनावट नोटा चलनात - मुदलीयार हा राजेश व अलका यांच्याशिवाय इतर कोणाच्या संपर्कात नव्हता. श्रीहरी हा पुण्यातील अटक आरोपींना बनावट नोटा चलनात आणण्यास देत होता. ताडीवाला परिसरात आरोपी किरकोळ वस्तू खरेदी करून या नोटा चलनात आणत होते. तर, मंचर परिसरात पती-पत्नी आठवडी बाजारात बनावट नोटा चलनात आणत. नोव्हेंबर महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. त्याने आतापर्यंत साधारण दहा लाख बनावट नोटा चलनात आणल्या असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004