कार भाड्याने दिल्याचे सांगून कारची परस्पर विक्री करून सात जणांची फसवणूक
Saturday, Jan 19 2019 5:09PM    CTNN
Tags: pune,crime,fraud,bhartiy vidhyapith police station,pune cheating case in bharati vidhyapith police station 1000007275

पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): कार भाड्याने दिल्याचे सांगून कारची परस्पर विक्री करून सात जणांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी सागर चव्हाण (वय 31 रा. रेठरे, कराड) यांनी फिर्याद दिली आहे. हितेश बिपिन पारेख (रा. कामोठे पनवेल) व जयदीप प्रकाश कुलकर्णी रा. धनकवडी अशी फसवणूक करणाऱ्या व्यक्तींची नावे आहेत.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश आणि जयदीप यांनी फिर्यादी सागर यांची टाटा इंडिका व्हिस्टा कार आणि त्यांच्या गावातील इतर सहा इसमांची चारचाकी वाहने त्यांच्याकडून घेतली. एका शासकीय कंपनीमध्ये भाड्याने दिल्याचे सांगून ती वाहने परस्पर विकली. दोघांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000078