ससुन रुग्णालयातून अपहरणाच्या गुन्ह्यातील अटकेत असलेला आरोपी पसार
Saturday, Jan 19 2019 5:18PM    CTNN
Tags: pune,sasun hospital,criminal run,accused run from sasoon hospital in pune 1000007276

पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): ससुन रुग्णालयातून अपहरणाच्या गुन्ह्यातील अटकेत असलेला आरोपी काल शुक्रवारी (दि.18) दुपारी 2 च्या सुमारास पळून गेला आहे. संजय वसंत नलावडे (वय 23, रा.दत्तवाडी) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई के. व्ही. साबळे यांनी फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससुन रुग्णालयात काल आरोपी संजय नलवडे हा फिर्यादी साबळे यांच्या कायदेशीर रखवालीमध्ये होता. परंतु फिर्यादी यांना गुंगारा देऊन तो दुपारी तेथून पळून गेला.

 

आरोपी संजय नलावडे याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात अपहरणासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये त्याला पोलिसांनी अटक केली होती. पळून गेलेल्या आरोपीचा शोध बंडगार्डन पोलीस घेत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004