मुंबईत महिला पोलिसाचा विनयभंग आणि पोलिसाला मारहाण प्रकरणी चौघांना अटक
Sunday, Jan 20 2019 2:13PM    CTNN
Tags: mumbai,crime,lady police,mumbai woman police molested four arrested 1000007287

मुंबई,दि.२०(चेकमेट टाईम्स): वाहन थांबवून तपासणी केल्यामुळे आलेल्या रागातून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीमध्ये भरस्त्यामध्ये महिला पोलीसाचा विनयभंग करून ज्ञानेश्वर मेश्राम या पोलीस शिपायास मारहाण केल्याचा प्रकार १४ जानेवारीला मुंबईत घडला होता. महिला पोलीसाचा विनयभंग करून फरार झालेला इब्राहिम शेख आता पोलीसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याला आणि अन्य चार साथीदारांना अटक करून पोलीसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने २ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

असिफ खुदूस शेख, शहाबाद शमशाद खान, मदस्सर उर्फ अफसर मुस्तकिन शेख आणि बुऱ्हाउद्दीन उर्फ बुऱ्हान मुशीउद्दीन शेख अशी गुन्हा करून फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत.मुंबई येथील पॅराडाईज सिनेमा गृहाजवळ पोलीस शिपायी ज्ञानेश्वर मेश्राम आणि त्यांच्या महिला सहकारी या कर्तव्य बजावत होत्या.

 

सायंकाळी साडे सहाच्या सुमारास भरधाव टॅक्सी वांद्रेच्या दिशेने जात होती.  त्या टॅक्सीला रोखून विचारपूस केली म्हणून मेश्राम या पोलीस शिपाया सोबत इब्राहिम शेख याने जोर जोरात भांडणं करायला सुरुवात केली. शाब्दिक बाचाबाची झाल्या नंतर इब्राहिम शेख बातमीत नमूद असणाऱ्या अन्य साथीदारांसोबत आला आणि मेश्राम यांना भर रस्त्यावर शिवीगाळ देऊ लागला.दरम्यान या पाच जणांनी महिला पोलीसाचा विनयभंग देखील केला.

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास चव्हाण यांना या प्रकरणाची माहिती मिळाली आणि त्यांनी लगेच घटना स्थळी धाव घेतली. माहीम पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा ,पोलीसांना शिवीगाळ देणे आणि महिला पोलीसाचा विनयभंग करणे अशा गंभीर प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करताच काही तासात टॅक्सी चालक इब्राहिम शेख याला अटक केली. त्यानंतर फरार झालेल्या अन्य चार साथीदारांना पोलीसांनी अटक केली आहे.

 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Mumbai,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004