जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर केले कोयत्याने वार
Sunday, Jan 20 2019 2:31PM    CTNN
Tags: pune,pimpri chinchwad,navmaharashtra school,crime,murder,highly knifed road attacke on young person by prejudice issue 1000007288

पिंपरी,दि.२०(चेकमेट टाईम्स): आपापसात झालेल्या जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी असून  ही घटना पिंपरी गावात नवमहाराष्ट्र शाळेजवळ शुक्रवारी (दि. 18) रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.

 

याप्रकरणी ओंकार बाळू सरोदे (वय 18, रा. हरिओम सोसायटी, काकडे पार्कजवळ, चिंचवडगाव) या तरुणाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशुतोष वाघिरे (वय 19), सुशील शिंदे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि हृषीकेश उर्फ मोन्या शामराव वाघिरे (वय 20, रा. श्रीधर अपार्टमेंट, पिंपरीगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार आणि आरोपी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी ओंकार याला शुक्रवारी रात्री दहा वाजता पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र शाळेजवळ शिवीगाळ केली. तसेच कोयत्यासारख्या हत्याराने त्याला मारहाण केली. यामध्ये ओंकार गंभीर जखमी झाला. पिंपरी पोलिसांनी आरोपी हृषीकेश याला अटक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004