सोने-चांदी आणि रोख रकमेसह दररोजच्या वापरातील कपडे देखील चोरले
Sunday, Jan 20 2019 2:49PM    CTNN
Tags: pune,pimpri chinchwad,nigadi police station,crime,thief 1000007289

चिंचवड,दि.२०(चेकमेट टाईम्स): सोने-चांदी आणि रोख रकमेसह आता दररोजच्या वापरातील कपडे देखील सुरक्षित ठेवण्याची वेळ आली आहे. कारण चिंचवड येथे एका सोसायटीमधून रोख रकमेसह दररोजच्या वापरातील कपड्यांची देखील चोरी झाली आहे. ही घटना मंगळवारी घडली असून याबाबत शुक्रवारी (दि. 18) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

पुष्पा किशोर बन्सल (वय 45, रा. गगणगिरी सोसायटी, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बन्सल यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना दुपारी चार ते रात्री आठ या कालावधीत हा चोरीचा प्रकार झाला. घरातील शांततेचा फायदा घेत चोरट्याने घरातील कपाटातील रोख रक्कम 15 हजार आणि वापरातील 1 हजार रुपयांचे कपडे चोरून नेले. हा प्रकार उघकीस आल्यानंतर बन्सल यांनी शुक्रवारी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून निगडी पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000142