वाहनाची चावी काढून तरुणीला जाण्यास मज्जाव केल्याप्रकरणी प्रियकर तरुणावर गुन्हा
Sunday, Jan 20 2019 3:54PM    CTNN
Tags: pune,pimpri chinchwad,crime,crime against youth for obstructing woman at dighi 1000007290

पिंपरी चिंचवड,दि.२०(चेकमेट टाईम्स): तरुणीला पाहुन प्रियकर तरुणाने तिच्या दुचाकीसमोर उभा राहून तिची वाट अडवली. तसेच तिच्या वाहनाची चावी काढून घेतली आणि तरुणीला जाण्यास मज्जाव केल्याप्रकरणी प्रियकर तरुणावर गुन्हा दाखल केला गेला आहे. ही घटना च-होली फाटा येथे पेट्रोल पंपाजवळ शनिवारी (दि. 19) दुपारी पाचच्या सुमारास घडली आहे.

 

विवेक चंद्रदेव राम भारती (वय 28, रा. परांडेनगर, दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद देखील दिली आहे .

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तरुणाचे पूर्वी प्रेम संबंध होते. काही कारणांवरून त्यांच्यात दुरावा आला. त्यानंतर शनिवारी दुपारी पाचच्या सुमारास तरुणी दुचाकीवरून घरी जात होती. दिघीमधील च-होली फाटा येथे पेट्रोल पंपासमोर तरुणी आली असता आरोपी तरुण तिच्या दुचाकीसमोर उभा राहिला. त्याने तरुणीच्या दुचाकीची चावी काढून घेतली. आरोपीने तरुणीला शिवीगाळ देखील केली. यावरून तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. दिघी पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004