उरुळी देवाची मधील मंतरवाडी चौकात बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक
Sunday, Jan 20 2019 5:47PM    CTNN
Tags: pune,uruli devachi,bhekainagar,laxi colony hadapasar,crime,arrested criminal,pisul,two arrested at pune in to handle illegal pistal 1000007291

पुणे,दि.२०(चेकमेट टाईम्स):  बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) शनिवारी (दि. 19) उरुळी देवाची मधील मंतरवाडी चौकात केली.

 

गणेश उर्फ गिल्या शामराव जगताप (वय 27, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, ता. हवेली), रणजित उर्फ डॅनी शरदचंद्र लोखंडे (वय 23, रा. लक्ष्मी कॉलनी, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी देवाची येथील मंतरवाडी चौकात तीनजण संशयितरित्या उभे असून त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती एलसीबीच्या पोलिसांनी मिळाली. त्यानुसार परिसरात सापळा रचून पोलिसांनी गणेश आणि रणजित या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याजवळ एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे असा 25 हजार 300 रुपये किमतीचा ऐवज मिळून आला. पोलिसांनी पिस्तूल आणि काडतुसे जप्त करत दोघांना अटक केली. पुढील कारवाईसाठी आरोपींना लोणी काळभोर पोलिसांकडे देण्यात आले आहे.

 

कारवाई दरम्यान आरोपींचा एक साथीदार पळून गेला आहे. आरोपी रणजित याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पुणे ग्रामीण एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधवर, महेश गायकवाड, निलेश कदम, दत्तात्रय तांबे, मोरेश्वर इनामदार, राजेंद्र पुणेकर, सचिन गायकवाड यांच्या पथकाने केली.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004