स्वामी नामाने वारजेचा आसमंत दुमदुमला
Sunday, Jan 20 2019 7:22PM    CTNN
Tags: pune,warje,namsmaran sohala swami samarth, 1000007293

पुणे, दि.२० (चेकमेट टाईम्स): भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेअसे आश्वस्त करत, साधकांना धाडसाच्या वाटेवर धावायला शिकवणारी शक्ती म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि म्हणूनच की काय स्वामींना ब्रह्मांडनायक देखील म्हणतात. याच ब्रह्मांडनायकाच्या अक्कलकोट समाधीमठ मूळ स्थानावरील स्वामी पदस्पर्शाने पावन झालेल्या रक्तचंदन पादुकांच्या दिव्य सहवासात, परम स्वामी भक्त श्री चोळाप्पा महाराजांचे पाचवे वंशज अण्णू महाराज पुजारी, पवन गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत, पुण्यातील वारजे येथे नामस्मरण सोहळा पार पडला. यावेळी अवघा आसमंत स्वामी नामाने दुमदुमला होता, परिसरात एकच पवित्र लहरी उत्पन्न झाल्या होत्या आणि अशातच कार्यक्रमाच्या शेवटी नामस्मरणात सहभागी झालेल्या भाविकांपैकी लॉटरी पद्धतीने पाच भाविक भक्तांना शेवटच्या आरतीचा लाभ देण्यात आला.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006