पुण्यातील प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये महिलेचा अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या वॉर्डबॉयला अटक
Sunday, Jan 27 2019 12:44PM    CTNN
Tags: pune,jahangir hospital,crime,vedio,ward boy,arrest, police,police arrested ward boy pune 1000007294

पुणे,दि.२७(चेकमेट टाईम्स): पुण्यातील प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिलेचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढण्यात आल्याचा धक्कादायक आणि लाजीरवाणा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी  हॉस्पिटलमधील वॉर्डबॉयला  अटक  केली आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसारतक्रारदार महिलेच्या पोटात दुखत असल्यामुळे  हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यांना एमआरआय काढण्यास सांगितले होते. त्यानुसार ही महिला शनिवारी सायंकाळी एमआरआय काढण्यासाठी जहांगीर हॉस्पिटलमध्ये आली होती. या महिलेला चेंजिंग रुममध्ये कपडे बदलण्यास सांगायला हवे होते परंतु  चेंजिंग रुममध्ये नेण्याऐवजी दुसऱ्याच खोलीत कपडे बदल्यास सांगितले गेले. त्यानंतर ही महिला एमआयआय करुन परत आली. तेव्हा तिला परत दुसऱ्या खोलीत कपडे बदल्यास सांगितले गेले.

 

महिला जेव्हा कपडे बदलू लागली, तेव्हा तिला तेथे एक मोबाईल दिसला. तिने तो मोबाईल घेऊन त्यात पाहिले असता ती कपडे बदलत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला गेला होता. ही गोष्ट या महिलेने आपल्या पतीला सांगितली. तिच्या पतीने याबाबत हॉस्पिटल प्रशासनाकडे चौकशी केल्यावर त्यांनी वॉर्डबॉयला बोलवून जाब विचारला. पण पुढे काहीही कारवाई केली नाही. तेव्हा त्यांनी 100 क्रमांकावर फोन करुन पोलिसांना कळविले. ही माहिती मिळताच कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहचले व त्यांनी वॉर्डबॉयला ताब्यात घेतले. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात येऊन वॉर्डबॉयला  अटक  करण्यात आली आहे.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004