जमिनीत गुंतविलेले पन्नास लाख रुपये परत मागितल्यामुळे डोक्याला पिस्तूल लावून धमकी
Sunday, Jan 27 2019 2:01PM    CTNN
Tags: pune,crime,demand,pistol,the pistol with a pistol demand for a ransom of rs one crore 1000007298

पुणे,दि.२६(चेकमेट टाईम्स): जमिनीत गुंतविलेले पन्नास लाख रुपये परत मागितल्यानंतर एकाच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. तर मुळशीत व्यवहार करायचा असल्यास 1 कोटीची खंडणीही मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

 

अविनाश शंकर धुमाळ (वय 43, रा. वाळवेकरनगर, सातारा रस्ता) याच्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वारगेट पोलिस ठाण्यात 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.  फिर्यादींच्या पतीची जमीन खरेदी-विक्रीची कंपनी आहे. त्यांची आणि धुमाळची ओळख आहे. धुमाळची मुळशीत 28 एकर जमीन असून, यात पैसे गुंतविण्यास सांगितले. यानंतर फिर्यादींनी या जमिनीत 50 लाख 17 हजार रुपये गुंतविले. मात्र, धुमाळने त्याची प्रक्रिया अर्धवट ठेवली. यामुळे फिर्यादींनी पैसे परत मागितले. त्यावेळी हे पैसे दुसर्‍या ठिकाणी वापरले आहेत. ती रक्कम नंतर व्याजासह परत करतो, अशी बतावणी केली. पैसे परत न करता फसवणूक केली. तसेच, फिर्यादी यांच्या पतीला मुळशीत व्यवहार करायचा असल्यास 1 कोटीची खंडणी मागितली.   

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004