सिंहगड पोलिसांनी एका कारमधल्या तिघांना तीन पिस्तुल,सहा काडतुसांसह केले जेरबंद
Sunday, Jan 27 2019 2:57PM    CTNN
Tags: pune,crime,pistol,kadtuse,three pistols three cardboard tied with six cartridges activities of sinhgad police pune 1000007301

पुणे,दि.२७(चेकमेट टाईम्स): सिंहगड पोलिसांनी एका कारमधून आलेल्या तिघांना जेरबंद करत त्यांच्या ताब्यातून ३ पिस्तुल आणि सहा काडतसे हस्तगत केली आहेत. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.

 

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मागील आठ दिवसात कारवाई करत सात पिस्तुल पकडल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी ही कारवाई करण्यात आली.

 

शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायात वाढ होताना दिसत आहे. मागील काही दिवसात शहरात 10 खुनाच्या घटनाही घडल्या आहेत. चोरी, मारामारी, गँगवर अशा घटनाही होताना दिसत आहे. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली आहे की नाही?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004