मारहाणीबाबत विचारल्यामुळे शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने वार
Sunday, Jan 27 2019 4:58PM    CTNN
Tags: pune,pimpri chinchwad,crime,attempt to murder,from the pre emigration major attack on son of shivsenasex corporate wakad 1000007302

पिंपरी चिंचवड,दि.२७(चेकमेट टाईम्स): जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण सुरु असताना शिवसेनेचे माजी नगरसेवक संपत पवार यांचा मुलगा मारहाणीबाबत विचारणा करण्यासाठी गेला असता त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 25) दुपारी बाराच्या सुमारास थेरगाव येथील लक्ष्मीबाई गार्डन गुजर नगर येथे घडली.

 

कुणाल संपत पवार (वय 20, रा. पवार नगर, सूर्यमुखी दत्त मंदिर चौक, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रवी भिलारे (रा. थेरगाव) आणि त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुणाल यांचा भाऊ कुंदन आणि त्याचा मित्र या दोघांना काहीजण जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण करत होते. त्यावेळी फिर्यादी कुणाल यांनी आरोपींना मारहाण का करत आहात?, अशी विचारणा केली. त्यावरून आरोपींनी कुणाल यांच्या डोक्यावर लोखंडी कोयत्याने वार केले. तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये कुणाल गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अन्य आरोपी अद्याप फरार आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने अधिक तपास करीत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004