महिलेला मारहाण करून तिच्याशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला
Sunday, Jan 27 2019 5:30PM    CTNN
Tags: pune,pimpri chinchwad,sangvi,crime,attempt to rape 1000007303

पिंपरी चिंचवड,दि.२७(चेकमेट टाईम्स): महिलेला मारहाण करून तिच्याशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी (दि. 25) पिंपळे गुरव येथे घडली. मात्र, भांडणाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

 

याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला. त्यानुसार बापू सर्जेराव गटाळ (वय 43), प्रीतम गटाळ (पूर्ण नाव माहिती नाही, रा. पिंपळे गुरव) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला हात पकडून धरून ठेवले. तिच्या चेह-यावर मारहाण करून तिच्याशी आरोपींनी अश्लील वर्तन केले. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी महिलेचे पती आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण करत शिवीगाळ केली. याबाबत महिलेने तात्काळ पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. याचा अधिक तपास सहाय्य्क पोलीस निरीक्षक अलका सरग करीत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004