पुण्यात दिवसाढवळ्या वादातून तरुणावर वार करून खून, धडापासून मुंडके केले वेगळे
Sunday, Jan 27 2019 6:25PM    CTNN
Tags: pune,sinhgad road,crime,murder,murder youth on singhagad road 1000007304

पुणे,दि.२७(चेकमेट टाईम्स): पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये एका तरुणाचे मुंडके छाटून खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली असून   या तरुणाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार देखील करण्यात आले आहेत. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार आज (रविवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास फन टाईम थिएटर समोर घडला. रोहीत साळवी (वय- २०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

प्राथमिक माहितीनुसार, सिहंगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फन टाईम थिएटर समोर आज दुपारी साडेतीनच्या सुमारास रोहीत साळवी याच्यावर काही जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यामध्ये रोहीत याचे मुंडके धडावेगळे करण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत 31 डिंसेवर रोजी झालेल्या वादातून चौघांनी आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून रोहितचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

 

पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत. दरम्यान, थिएटर समोर हा प्रकार घडल्याने या ठिकाणी एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004