येरवडा पोलिसांनी लक्झरी स्पा सेंटरमधील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश
Monday, Jan 28 2019 4:46PM    CTNN
Tags: pune,spa center,yerwada police,high profile sex racket exposed in luxury spa center 1000007314

पुणे,दि.२८(चेकमेट टाईम्स): स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत महाराष्ट्रासह मनिपुर, नागालँड येथील सहा मुलींची सुटका करुन एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (दि.२७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कल्याणीनगर येथील फोर्टलिझा सोसायटीतील स्पा हेवन, लक्झरी स्विडीश अँड थाई मसाज सेंटरमध्ये करण्यात आली.

 

सोमनाथ बनवारीलाल केडीया (वय-४६ रा. क्लोव्हर पार्क व्युव्ह, कोरेगाव पार्क, पुणे) याला अटक केली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार बाळासाहेब आप्पासाहेब गायकवाड (वय-५२) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कल्याणीनगर येथील स्पा हेवन, लक्झरी स्विडीश अँड थाई मसाज सेंटरमध्ये अवैध रित्या सेक्स रॅकेट चालवला जात असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली.

 

पोलिसांनी या माहितीची खातरजमा करण्यासाठी डमी ग्राहक पाठवला. ग्राहकाने या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून महाराष्ट्रातील तीन, मनिपुर राज्यातील दोन तर नागालाँड येथील एका मुलीची सुटका केली.

 

याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथ केडीया याला अटक केली आहे. आरोपीने पीडित मुलींना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करवून घेत होता. मिळालेल्या पैशातून तो स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे समोर आले आहे. सुटका करण्यात आलेल्या मुलींना रेक्स्यू होममध्ये ठेवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) बालवडकर हे करित आहेत.

 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004