दोन तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून मुलीची आत्महत्या
Friday, Feb 1 2019 3:04PM    CTNN
Tags: pune,dound,baramati,crime,suiside,girl 1000007320

पुणे,दि.1(चेकमेट टाईम्स): दोन तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील साक्षी विद्याधर उघाडे या 15 वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. 30) रोजी घडली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी गौरव संजय भोसले व वामन सूर्यकांत भोसले या दोघा तरुणांना अटक केली. 

 

याबाबत तालुका पोलिस ठाण्यात मृत साक्षीचे वडील विद्याधर लघू उघाडे (रा. रमामातानगर, माळेगाव, मूळ रा. शालीमार चौक, फॉरेस्ट कॉर्टर, दौंड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपींना शनिवारपर्यंत (दि. 2 फेब्रुवारी) पोलिस कोठडी सुनावली.  याप्रकरणी सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. स्नेहल नाईक यांनी काम पाहिले.  साक्षी ही शिवनगर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत शिक्षण घेत होती. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास साक्षी हीने वडिलांना फोन करीत शेजारी राहणारे गौरव व वामन ही मुले माझी नेहमी छेडछाड करीत असतात. बुधवारीही गौरव याने छेडछाड केल्याचे कळविले. या वेळी साक्षी ही रडत होती.  तिचे वडील स्कूलबसवर चालक म्हणून काम करतात. त्यांनी विद्यार्थ्यांना घरी सोडल्यानंतर शेजारी राहणार्‍या विशाल चंद्रकांत घोडके यांना फोन करत सदर घटनेची कल्पना दिली. तसेच, घरी जाऊन मुलीला धीर द्या असेही सांगितले. त्यानंतर काही वेळातच घोडके यांनी तुमच्या मुलीला सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात आणले आहे, असा निरोप फिर्यादीला फोनद्वारे दिला. फिर्यादी तेथे गेल्यानंतर त्यांना खरी हकीकत कळाली. साक्षी हीने वडिलांना फोन केल्यानंतर घरातच  आत्महत्या केली होती.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000044