पोटच्या तीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या बापाला जन्मठेप; आईलाही शिक्षा
Friday, Feb 1 2019 3:17PM    CTNN
Tags: pune,crime,kondhva,rape,father,girl 1000007321

पुणे,दि.1(चेकमेट टाईम्स): पोटच्या तीन मुलींवर पती बलात्कार करीत असल्याचे माहिती असूनही, त्याला पाठीशी घालणाऱ्या महिलेला ७ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. या प्रकरणातील पित्याला न्यायालयाने जन्मठेप आणि १४  हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

 

विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोणे यांनी हा निकाल दिला. दंड न भरल्यास पित्याला १ वर्षे, तर मातेला सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. शिक्षा झालेला पिता ४५, तर माता ४० वर्षांची आहे. हे कुटुंबीय कोंढवा भागात राहत असून, मूळचे उत्तर प्रदेशातील आहे. बलात्काराच्या घटना २०१० ते २२ एप्रिल २०१५ या कालावधीत घडल्या.

 

पित्याने २२, १९ आणि १५ वर्षांच्या मुलींवर बलात्कार केला. याबाबत कोणाला न सांगण्याची धमकी त्याने दिली होती. मात्र, १५ वर्षीय मुलीने याबाबत ओळखीच्या महिलेला सांगितले होते.

 

त्यानंतर घरातील गोष्टी बाहेर सांगितल्याच्या रागातून पित्याने १५ वर्षीय मुलीला मारहाण केली. त्या वेळी ती मुलगी रागाने तिच्या मावशीच्या घरी गेली. त्यानंतर तिने कोंढवा पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती दिली.

 

पोलिसांनी पती आणि त्याला मदत केल्याप्रकरणात पत्नीवर गुन्हा दाखल केला. फौजदार शीतल सुतार यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना कोर्ट कॉन्स्टेबल अश्विनी पाटील यांनी मदत केली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. या खटल्यात १५ वर्षीय मुलगी आणि शेजारील महिलेची साक्ष तसेच, वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004