जुन्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी तरुणाला मारहाण करून केले जखमी
Friday, Feb 1 2019 4:58PM    CTNN
Tags: pune,crime,attempt to murder,hadapsar,mahalaxmi mandir,pune the young minor assaulted the young man 1000007324

पुणे,दि.1(चेकमेट टाईम्स): जुन्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी तरुणाला मारहाण करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे.ही घटना बुधवारी (दि.30) रात्री साडेअकराच्या सुमारास हडपसर येथील महालक्ष्मी मंदिरासमोर घडली आहे.याप्रकरणी अनिकेत वायदंडे (वय 19, रा. रामटेकडी, हडपसर) याने फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिकेत हा दुचाकीवर बुधवारी रात्री उशिरा लोंढे शाळेकडून त्याच्या घरी निघाला होता. अनिकेतचे काही दिवसांपूर्वी एका मुलासोबत किरकोळ वाद झाले होते. या भांडणाचा बदला घेण्यासाठी त्या चौघांनी अनिकेतला आडवले आणि त्याला थांबवून शिवीगाळ करून त्याला मारहाण करण्यास सुरवात केली.

तसेच एकाने त्याच्या डाव्या हातावर कोयत्याने वार केले. या मारहाणीत अनिकेत हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्या इतर तीन साथीदारांचा शोध वानवडी पोलीस घेत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004