कारचा गिअर बदलण्याच्या बहाण्याने प्रवासी म्हणून बसलेल्या महिलेला विनयभंग
Friday, Feb 1 2019 5:21PM    CTNN
Tags: pune,pimpri chinchwad,hinjawadi,crime,hinjawadi molestation ola cab driver arrested 1000007325

पिंपरी चिंचवड,दि.1(चेकमेट टाईम्स): कारचा गिअर बदलण्याच्या बहाण्याने प्रवासी म्हणून बसलेल्या महिलेला स्पर्श करून तिचा विनयभंग केला. ही घटना गुरुवारी (दि. ३१) दुपारी एकच्या सुमारास पाषाण ते बावधन दरम्यान घडली. याप्रकरणी ओला कॅब चालकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.


 राजेश सौरव बाराते (वय 20, रा. मारुती मंदिराजवळ, रावेत गावठाण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

 याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पीडित तरुणी ओला कॅबने कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन मुंबई बंगलोर महामार्गावरून सूसखिंड, पाषाण ते ऑक्‍सफर्ड रोड, हेलिपॅड रोड या मार्गाने जनावरांच्या दवाखान्यात जात होत्या. त्यावेळी त्या मोटार चालकाच्या बाजूच्या सीटवर बसल्या होत्या.

 ओला कॅब चालक बाराते याने मोटारीचा गिअर बदलण्याच्या बहाण्याने तसेच कुत्र्याच्या पिल्लास हात लावण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग केला. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आनंद पगारे तपास करीत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004