माहेरहून 25 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ
Friday, Feb 1 2019 5:54PM    CTNN
Tags: pune,pimpri chinchwad,hinjawadi,hinjawadi under domestic voilance casefir against 4 persons 1000007326

पिंपरी चिंचवड,दि.1(चेकमेट टाईम्स): माहेरहून 25 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेच्या छळ करण्यात आला. याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 फेब्रुवारी 2018 ते 10 जुलै 2018 या कालावधीत उंब्रज बावधन म्हाळुंगे येथे घडला.

 

याप्रकरणी विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती रवींद्र धनाजी जाधव (वय 30), सासरे धनाजी नागोजीराव जाधव (वय 60), सासू जयश्री जाधव (वय 55, तिघेही रा. मु. पो. उंब्रज, ता. कराड, जि. सातारा) आणि नणंद माधवी भास्करराव पाटील (वय 33, रा. गजानन हाऊसिंग सोसायटी, कराड, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारी 2018 ते 10 जुलै 2018 या कालावधीत आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी विवाहिता यांनी माहेराहून 25 लाख रुपये आणावेत, अशी मागणी केली. यासाठी विवाहितेने नकार दिल्याने तिचा वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केला. तसेच हाताने आणि लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक इरले तपास करीत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004