खराडी परिसरातील एका बोगस कॉल सेंटरचा गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला
Saturday, Feb 2 2019 2:05PM    CTNN
Tags: pune,kharadi ,crime,raid on boggs call center 1000007329

पुणे,दि.२(चेकमेट टाईम्स): खराडी परिसरातील एका बोगस कॉल सेंटरवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. दरम्यान, पुणेकरांना परदेशातून गंडाविण्यात येत असल्याच्या तक्रारी असतानाच, पुण्यातही बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांना फसविले जात असल्याचे या प्रकरणावरून समोर आले आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून पाच जणांना अटक करत हार्डडिस्क, लॅपटॉप, हेडफोन, डेबिट कार्ड, मोबाइल असा ऐवज जप्त केला आहे. 

 

शालीन बिपीन पंचाल, धनंजय बिपीनभाई पंचाल (दोघे, रा. दर्शन अपार्टमेंट, अहमदाबाद, गुजरात), निसर्ग सुभाष पंडित (रा. सहारा एनक्लेव्ह, विमाननगर, मूळ रा. नवदुर्गा सोसायटी, पाटण, गुजरात), मितेश गोकुल ठक्कर (रा. हरिओम व्हिला, अहमदाबाद, गुजरात), ऐश्वर्य मोहन भारद्वाज (रा. साई कृष्णा अपार्टमेंट, भाईंदर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

खराडी-चंदननगर भागातील एका कॉल सेंटरमधून परदेशातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार केले जात असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त भानूप्रताप बर्गे यांना मिळाली. त्यानंतर शुक्रवारी पहाटे प्राईड आयकॉन सोसायटीत असलेल्या सदनिकेवर छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. हे पाचही जण अमेरिका आणि कॅनडातील नागरिकांना गंडा घालत होते. अनेक हार्डडिस्कवर या नागरिकांची माहिती साठविण्यात आली होती. पोलिसांनी या कारवाईत 25 हार्डडिस्क, 14 लॅपटॉप तसेच आयट्यून कार्ड असा अडीच लाखांचा ऐवज जप्त केला. प्रभारी अतिरिक्त पोलिस आयुक्त ज्योतीप्रिया सिंह, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त भानूप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004