गेल्या वीस महिन्यांपासून वेतन न झाल्यामुळे कामगाराची आत्महत्या
Saturday, Feb 2 2019 3:33PM    CTNN
Tags: pune,pimpri chinchwad,mangalnagar,thrgav,suiside,h.a.worker suicide 1000007331

पिंपरी चिंचवड,दि.२(चेकमेट टाईम्स) :  गेल्या वीस महिन्यांपासून वेतन न झाल्यामुळे परिस्थितीशी झुंज देत असलेल्या पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिक (एच. ए.) कंपनीच्या एका कामगाराने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना शुक्रवारी (दि. 1) अडीचच्या सुमारास थेरगाव-मंगलनगर येथे घडली.

 

रामदास शिवाजीराव उकिरडे (51, रा. मंगलनगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. उकिरडे हे पिंपरी येथील एच. ए.  कंपनीतील लॅबमध्ये काम करीत होते. त्यांचे वेतन काही महिन्यांपासून रखडले असल्याने ते नैराश्याच्या गर्तेत होते. उकिरडे कंपनीतून घरी आल्यानंतर दररोज वेतनाबाबतची चर्चा करीत. वेतन मिळत नसल्याने ते हतबल झाल्याचे त्यांच्या पत्नीने  पोलिसांना सांगितले. संसाराला हातभार लावण्यासाठी त्यांच्या पत्नीने ब्युटीपार्लरचे दुकान सुरू केले. मात्र, तरीदेखील त्यांच्या मनावरील ताण हलका होत नव्हता. उकिरडे आपल्या मुलांजवळ वेतनाबाबतची चर्चा करीत होते. त्यांच्या मुलानेही हा वाईट काळ निघून जाईल, असे सांगून समजावले होते. तरीदेखील ते चिंताग्रस्त होते. अखेर त्यांनी शुक्रवारी घरात एकटे असताना साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. एच. ए. कंपनी तोट्यात असल्याने 900 कामगारांचे पगार वीस महिन्यांपासून रखडले आहेत. 

 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000044