कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी आरोप असलेले आनंद तेलतुंबडे यांना अटक
Saturday, Feb 2 2019 4:41PM    CTNN
Tags: pune,mumbai,aanand teltumbde arrested by pune police 1000007333

पुणे,दि.२(चेकमेट टाईम्स): कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी आरोप असलेले आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी आज पहाटे मुंबईतून अटक केली. पुणे सत्र न्यायालयाने यापूर्वी झालेल्या सुनावणीत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

 

पुणे सत्र न्यायालयाने 31 जानेवारीला झालेल्या सुनावणीत तेलतुंबडे यांना जामीन देण्यास नकार दिला होता. देशात अराजकता माजवण्यासाठी तुम्ही कोरेगाव भीमा दंगल घडवून आणा, असा ठराव भारतीय कम्यूनिस्ट पक्षाने (माओवादी) केला, असा दावा न्यायालयामध्ये करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004