डॉ. आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर,विशेष न्यायालयाचा पुणे पोलिसांना आदेश
Saturday, Feb 2 2019 7:43PM    CTNN
Tags: pune,aanand teltumbde,bhima koregaon case pune sessions court orders release aanand teltumbde 1000007338

पुणे,दि.२(चेकमेट टाईम्स): मुंबई विमानतळावर असतानाच पुणे पोलिसांकडून तेलतुंबडेंना अटक करण्यात आली. तेलतुंबडेंना  लगेचच पुण्याला रवाना करण्यात आले.

 

भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलीसानी  आज शनिवार दि.२ रोजी सकाळी अटक केली होती. पुण्यातील सत्र न्यायालयानं शुक्रवारी त्यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी  त्यांना अटक केली. मात्र, ही अटक अवैध असल्याचं विशेष न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुणे पोलिसांच्या कारवाईला मोठा धक्का बसलाय. 

 

मुंबई विमानतळावर  उतरताच पुणे पोलिसांकडून तेलतुंबडेंना अटक करण्यात आली. त्यानंतर, पुणे पोलिसांनी तेलतुंबडेंना पुण्याला नेले असून, आज न्यायालयात हजर करून त्यांच्या कोठडीची मागणी करण्यात येत होती. मात्र, येथील विशेष न्यायालयाने ही अटक अवैध असल्याचं म्हटलंय. पुणे पोलिसांना हा मोठा धक्का असून लवकरच तेलतुंबडेंची सुटका होण्याची शक्यता आहे.

 

पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती. मात्र 'मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेलो नाही आणि कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही', असा दावा करत आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.

 

आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेवर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. त्यांच्या बाजूने रोहन नहार यांनी युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांना 4 आठवड्यांचे संरक्षण दिले असताना, ही अटक म्हणजे न्यायालाचा अवमान आहे, असे विशेष न्यायालयाने म्हटले आहे. तसेच हे संरक्षण 11 फेब्रुवारीपर्यंत कायम असल्याचेही न्यायलयाने स्पष्ट केले.

जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी यास विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 4 आठवड्यात योग्य न्यायालयात जाऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करता येत होता. ज्यादिवशी त्यांनी हा अर्ज केला तेव्हाच, हे संरक्षण संपले. हा अर्ज फेटाळल्याने पोलिसांना अटक करता आली. त्यांनी अर्ज केला नसता तर पोलिसांनीही अटक केली नसती, असा युक्तिवाद उज्ज्वला पवार यांनी केला. परंतु, विशेष न्यायालयाने तेलतुंबडे यांची अटक अवैध ठरवली. 

 

 

 

 

 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004