सहा आसनी रिक्षात बसलेल्या तरुणीचे अपहरण करून तिचा विनयभंग
Sunday, Feb 3 2019 2:46PM    CTNN
Tags: pune,swarget,singhgad road,attempt to rape,crime,molestation by kidnyaping a migrant girl 1000007339

पुणे,दि.३(चेकमेट टाईम्स): स्वारगेट येथून घरी जाण्यासाठी सहा आसनी रिक्षात बसलेल्या तरुणीचे अपहरण करून तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. तरुणीने धाडस दाखवून रिक्षा चालकास विरोध करत चालत्या रिक्षातून उडी मारली. यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात 23 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनयभंग व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

पीडित तरुणी ही पुणे स्टेशन परिसरात एका डान्सच्या क्लासला जाते. सरावासाठी रविवारी ती गेली होती. रात्री क्लास करून ती परत धायरीला घरी येत होती. साडेअकराच्या सुमारास ती स्वारगेट येथे आली. एका सहा आसनी रिक्षामध्ये बसली. त्यावेळी तिच्यासोबत एक महिला व एक पुरुष असे दोन प्रवासी होते. ते दोघेही हिंगणे परिसरात उतरले. 

 

रिक्षात तरुणी एकटीच होती. चालकाने काम असल्याचे सांगत हिंगणे कॅनॉल रस्त्याने रिक्षा घेतली. त्यानंतर गोयल गंगा येथील चौकातून पुन्हा सिंहगड रस्त्याला आला. धायरीकडे रिक्षा न नेता त्याने रिक्षा मुंबई-बंगळुरू महामार्गावर वळविली. तरुणीने चालकास इकडे कुठे जाताय, मला धायरीत सोडा, असे सांगितले. त्यावेळी चालकाने माझे इकडे काम आहे. दहा मिनिटात तुला सोडतो, असे म्हणत रिक्षा नर्‍हेच्या दिशेने नेली. गोल्ड जिमजवळ तरुणीने त्या रिक्षा चालकास प्रतिकार करत रिक्षा थांबविण्यास सांगितली. त्यावेळी चालकाने चेहर्‍याला बांधलेला तरुणीचा स्कार्प ओढला.

 

तसेच तिच्या टॉपची कॉलर पकडून तिचा विनयभंग केला. त्यावेळी तिने प्रतिकार करत चालत्या रिक्षातून उडी मारली. रिक्षाचालक पसार झाला. तिने मित्राला फोन करून बोलाविले. यामुळे तरुणी खूपच घाबरली होती. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार केल्यानंतर दुसर्‍या दिवशी तिने सिंहगड रोड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून रिक्षाचालकाचा शोध सुरू केला आहे.

 

 

<iframe src="https://www.facebook.com/plugins/like.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fcheckmatetimes%2F&width=450&layout=standard&action=like&size=large&show_faces=true&share=true&height=80&appId=195012221238858" width="450" height="80" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allow="encrypted-media"></iframe>

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004