पाठलाग करून एकतर्फी प्रेमातून रस्त्यात अडवून तरुणीचा विनयभंग
Sunday, Feb 3 2019 4:25PM    CTNN
Tags: pimpri chinchwad,bird valli,crime,molestation,chinchwad molestation case fir registered against youth 1000007343

पिंपरी चिंचवड,दि.३(चेकमेट टाईम्स): तरुणी तिच्या कारमधून जात असताना आरोपीने तिच्या कारला आपली गाडी आडवी लावून तिच्याशी अश्लील वर्तन केले. त्यानंतर तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. हा सर्व प्रकार एकतर्फी प्रेमातून झाला. ही घटना बर्ड व्हॅलीसमोर सार्वजनिक रस्त्यावर घडली.

 

याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मनीष ओमप्रकाश पांडे (वय 24, रा. हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मागील पाच वर्षांपूर्वी ते एकाच क्लासमध्ये शिकत होते. तिथे त्यांची ओळख झाली होती. त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झाले. मात्र, महिन्यांपूर्वी दोघांमध्ये भांडण झाले. तरीही आरोपी तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. 25 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी तरुणी तिच्या कारमधून जात होती.

 

चिंचवडमधील बर्ड व्हॅलीसमोर आल्यानंतर आरोपीने त्याची गाडी तरुणीच्या कारला आडवी लावली. तिला कारमधून बाहेर बोलावले आणि तरुणीसोबत अश्लील वर्तन केले. तसेच तिचा पाठलाग केला. यावरून गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. वाय. होळकर करीत आहेत

 

<iframe src="https://www.facebook.com/plugins/like.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fcheckmatetimes%2F&width=450&layout=standard&action=like&size=large&show_faces=true&share=true&height=80&appId=195012221238858" width="450" height="80" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allow="encrypted-media"></iframe>

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004