व्यवसायातील भागीदारी परस्पर रद्द करून 43 लाख 39 हजारांना लुटले महिलेला
Sunday, Feb 3 2019 4:55PM    CTNN
Tags: pimpri chinchwad,nigadi,crime,fraud,nigadi 43 lakh cheating of woman by mutual cancellation of business partnership 1000007344

पिंपरी चिंचवड,दि.३(चेकमेट टाईम्स): व्यवसायातील भागीदारी भागीदार महिलेच्या परस्पर रद्द करून चौघांनी मिळून तब्बल 43 लाख 39 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 22 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2019 या दरम्यान घडला.

 

याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सवाराम देवासी (वय 32), चैनी देवासी (वय 30) स्मिता देशमुख (वय 39, तिघे रा. ओम चौक, चिंचवड), योगेश देशमुख (वय 43) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची ग्लोबल फर्मा कंपनीत आरोपींसोबत भागीदारी आहे. आरोपींची फिर्यादी यांची कंपनीमधील भागीदारी रद्द केली. त्यानंतर आरोपींनी कंपनीच्या खात्यावरून 40 लाख रुपयांचा धनादेश (चेक) फिर्यादी यांना कोणतीही माहिती नसताना दिला. तसेच काही कागदपत्रांचे बनावट दस्त ऐवज बनवून फिर्यादी यांची फसवणूक केली.

 

फिर्यादी यांनी कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली 43 लाख 39 हजार रुपयांची रक्कम आरोपींनी परत न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे तपास करीत आहेत.

<iframe src="https://www.facebook.com/plugins/like.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fcheckmatetimes%2F&width=450&layout=standard&action=like&size=large&show_faces=true&share=true&height=80&appId=195012221238858" width="450" height="80" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allow="encrypted-media"></iframe>

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000078