पुण्यातील नारायण पेठेतील एका ज्येष्ठ नागरिकाला ३५ लाखाला लुटले
Monday, Feb 4 2019 2:58PM    CTNN
Tags: pune,narayanpeth,vishrambag police station,fraud,35 lakhs,pune old man cheated by one unknown person by 35 lak 1000007349

पुणे,दि.४(चेकमेट टाईम्स): पुण्यातील नारायण पेठेतील एका ज्येष्ठ नागरिकाला कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने 35 लाखांनी फसवल्याचा प्रकार उघडकीस आला.

 

रामकृष्ण जोशी (वय 59) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी जोशी यांना जुलै 2014 मध्ये एक फोन आला होता. त्यामध्ये त्यांना बँकेतून कर्ज मिळवून देऊ असे सांगण्यात आले होते. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी बँक प्रोसिजरसाठी वेळोवेळी 34 लाख 93 हजार रुपये आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यावर भरले. परंतु कित्येक दिवस होऊनही कर्ज न मिळाल्याने जोशी यांनी अखेर पोलिसात तक्रार दिली. विश्रामबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

<iframe src="https://www.facebook.com/plugins/like.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fcheckmatetimes%2F&width=450&layout=standard&action=like&size=large&show_faces=true&share=true&height=80&appId=195012221238858" width="450" height="80" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allow="encrypted-media"></iframe>

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000078